ओसामा बिन लादेनची ‘ही’ होती शेवटची इच्छा

osama
ओसामा बिन लादेन हा जगातील सर्वात कुप्रसिद्ध दहशतवादी ओळखला जात होता. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा लादेन प्रमुख होता. त्याची दहशत जगभरात पसरली होती. न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला तसेच जगभरातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचा आरोप आहे.
osama4
अमेरिकेच्या स्पेशल कमांडो फोर्सने 2 मे 2011 रोजी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या जवळ अब्टाबादमध्ये मारले. आश्चर्य वाटेल पण लादेनवर त्यावेळी 5 करोड डॉलरचे बक्षीस ठेवले गेले होते.
osama5
असे म्हटले जाते की, लादेनकडे कोट्यवधीची मालमत्ता होती. अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी ‘एबीसी’ यांनी काही वर्षांपूर्वी एक अहवाल जारी केला होता. यात म्हटले होते की लादेनने सुदानमध्ये 29 मिलियन डॉलर्सची संपत्ती लपविली होती. अहवालात अशीही शक्यता वर्तवली गेली होती की ही त्याला ही संपत्ती त्याच्या वडिलांकडून मिळाली होती.
osama2
अमेरिकेने ताब्यात घेतलेल्या अलकायदाच्या कागदपत्रामध्ये हेही उघड झाले आहे की बिन लादेन तणावग्रस्त होता. कारण अमेरिका त्याच्या शोधात होती. लादेनच्या पत्नीने डॉक्टरांकडुन आपल्या दाताचा उपचार घेतला होते. त्यानंतर लादेनला नेहमीच वाटायचे की डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीच्या दातांमध्ये एक ट्रॅकिंग डिव्हाइस (जीपीएस) ठेवले आहे. त्यावरुन नेहमीच मला ट्रॅक केले जात आहे.
osama3
ओसामा बिन लादेन हा शिक्षण घेत असताना कट्टरवादी इस्लामी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. त्यावेळी तो सौदी अरेबियाच्या शाह अब्दुल्ला अजीज विद्यापीठात सिव्हिल इंजिनीअरिंगचा अभ्यास करत होता. पण नंतर तो एक दहशतवादी बनला.
osama6
असे म्हटले जाते की, ओसामा बिन लादेनच्या मृत्यूच्या 12 तासांनंतर अमेरिकेच्या विमानात लादेनला एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून एका मोठ्या पिशवीत ठेवले होते. नंतर त्याला अरबी समुद्रात फेकले गेले. कारण अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, सौदी अरेबियाने त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला होता. अमेरिकेच्या गुप्तचर एजन्सी सीआईएचे माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडन काही वर्षांपूर्वी दावा केला होता, की त्याच्याजवळ असा पुरावा आहे की, ओसामा बिन लादेन अद्याप ही जिवंत आहे. एवढेच नाही तर तो अमेरिकेच्या पैशावर मौजमजा करत आहे.
osama7
लादेनच्या जागेवरून जप्त केलेल्या कागदपत्रांनुसार, त्यांची शेवटची इच्छा होती की जगात दहशतवाद हा कायम राहीला पाहिजे यासाठी त्याच्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचा वापर केला जावा.

Leave a Comment