अडीच रुपयांच्या नोटेची शताब्दी- आजची किंमत सात लाख रुपये

auction
भारतात एके काळी अडीच रुपयांची नोटही प्रचलित होती, ही गोष्ट फार कमी जणांना माहीत आहे. येत्या मंगळवारी या नोटेला 100 वर्ष पूर्ण होणार असून या नोटेची आजची किंमत सात लाख रुपये आहे.

या अडीच रुपयांच्या नोटेचा आकार 12 गुणिले 17 सेमी होता. या नोटेवर एकीकडे दोन रुपये आठ आणे लिहिले आहे. ही नोट अत्यंत दुर्लभ मानली जाते.

ही नोट 22 जानेवारी 1918 रोजी चलनात आली होती, मात्र एक जानेवारी 29126 रोजी ही नोट बंद करण्यात आली होती. त्यावेळी ब्रिटिश सत्ता असल्यामुळे या नोटेची छपाई ब्रिटनमध्ये होत असे. नोटेवर जॉर्ज पंचमचे चिन्ह आणि छायाचित्र होते. ब्रिटनच्या तत्कालीन वित्त सचिवांची त्यावर सही आहे. तसेच त्यावर आठ भाषांमध्ये नोटेची किंमत लिहिलेली आहे.

रांचीतील मजी राज्यसभा खासदार अजय मारू यांच्याकडे ही नोट आहे. आपल्या आजोबांनी ही नोट आपल्याला दिल्याचे त्यांनी एका वृत्तपत्राला सांगितले. या नोटेची किंमत कळाल्यावर त्यांना अशा दुर्मिळ नोटांच्या संग्रहाचा नाद लागला. आता अजय मारू देश-विदेशातील जुन्या नोटा गोळा करतात.

Leave a Comment