जगातील सर्वात गोंडस कुत्र्याचा नैराश्यामुळे मृत्यू

dog
जगातील सर्वात गोंडस कुत्र्याचा अत्यंत मृत्यू झाला आहे. त्याच्या मालकाने त्याच्या मृत्युची बातमी फेसबुकवरून जाहीर केली. हा कुत्रा 12 वर्षांचा होता.

बू नावाचा हा पोमेरानियन कुत्रा आणि त्याच्या साथीदार बडी हे गेल्या वर्षी इंटरनेटवर प्रसिद्ध झाले होते. फेसबुकवर त्याच्या पेजचे 16 दशलक्ष फॉलोअर होते.

“बडीचा मृत्यू झाल्यानंतर काही काळाने बूच्या हृदयात समस्या निर्माण झाली. बडी आम्हाला सोडून गेला तेव्हा त्याचा अक्षरशः हृदयभंग झाला, असे आम्हाला वाटते,” असे त्याच्या अमेरिकी मालकांनी लिहिले आहे.

“आमचे कुटुंब शोकग्रस्त आहे, परंतु त्याला आता कोणतीही दुःख किंवा वेदना होत नाही हा विचार येऊन मनाला दिलासा मिळतो. बूने जगभरातील लोकांना आनंद दिला,” असे त्यांनी लिहिले आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून अनेकांनी आपल्या डोळ्यांत अश्रू जमा झाल्याचे लिहिले आहे.

बू याला 2012 मध्ये व्हर्जिन अमेरिकेचा अधिकृत पेट लायझन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच अनेक पुस्तकांमध्ये तो झळकला होता. त्याच्या नावाने “बू: दी लाइफ ऑफ द वर्ल्डज कटेस्ट डॉग” हे पुस्तक 2011 साली आले होते.

Leave a Comment