अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षच करणार

harish-rawat
देहराडून – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिष रावत यांनी अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षच करणार, असा दावा केला आहे.

नेहमीच जनभावनेचा भाजपमधील लोकांनी अनादर केला आहे. भगवान रामांचे ही लोक कधीच भक्त असू शकत नाहीत. जनभावनेचा आणि संविधानाचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर बांधले जाईल, असे रावत यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) राम मंदिरावरुन भाजपवर टीका केली आहे. आता २०२५ मध्येच राम मंदिर बांधले जाणार असल्याचे संघाने म्हटले आहे. अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर देशातील विकासकामे गतीने होतील, असे वक्तव्य संघाचे भैय्याजी जोशी यांनी केले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राम मंदिरासाठी आवश्यक पुढाकार घेत नसल्याची टीकाही संघाने केली आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद जमीन वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

Leave a Comment