आत्तापर्यंत ५१ महिलांचा शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश

sabrimala
बंगळुरू – सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरामध्ये महिलांच्या प्रेवशाची बंदी उचलण्याचे आदेश दिले असून शबरीमला मंदिरामध्ये आदेश दिल्याच्या तारखेपासून आत्तापर्यंत ५१ महिलांनी प्रवेश केला आहे, अशी साक्ष सर्वोच्च न्यायालयाला केरळ सरकारने दिली आहे. २ महिलांनी शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने त्यावेळी सुनावणी करताना केरळ सरकारला प्रश्न विचारला होता.

दोन महिलांनी शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश करताना विरोध झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने त्यावर सुनावणी केली. न्यायालयाने त्यावेळी राज्य सरकारला प्रश्न केला होता. किती महिलांनी आत्तापर्यंत मंदिरात प्रवेश केला होता. राज्य सरकारने याबद्दल तपशिलवार माहिती द्यावी, असे न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यावेळी एक नोट देऊन सरकारने आपली बाजू स्पष्ट केली. न्यायालयाने आदेश दिल्यापासून आत्तापर्यंत जवळपास ५१ जणांनी मंदिरामध्ये प्रवेश केला आहे, असे स्पष्टीकरण केरळ सरकारने दिले.

ऑक्टोबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश करण्याची महिलांना असलेली बंदी उचलली होती. अनेक महिलांनी त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कट्टरवाद्यांच्या विरोधामुळे अनेक महिलांना प्रवेश करण्यापासून वंचित रहावे लागले होते. त्यानंतर अनेकवेळा काही महिलांनी न्यायालयाला विशेष सुरक्षेची मागणी केली होती. ती सुरक्षा राज्य सरकारने पुरवावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालाय वेळोवेळी देत आले आहे.

Leave a Comment