कोणत्याही विशिष्ट धर्म, जातीचा किंवा भाषेचा नाही आपला देश – नितीन गडकरी

nitin-gadkari
नागपूर – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना भारत हा कोणत्याही विशिष्ट धर्म, जात किंवा भाषेचा नाही. ज्यांचे देशावर प्रेम आहे त्यांचा हा देश आहे. मग ते हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन असोत की आणखी कुणी असो असे म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते कट्टरतावादी वक्तव्य करत असतात. पण, पक्षाच्या नेत्याच्या विपरीत भूमिका घेताना नितीन गडकरी बऱ्याचदा दिसतात. त्यांनी मागील काही दिवसात अशी वक्तव्ये केली, जी भाजप नेतृत्वाच्या भूमिकेविपरीत होती. त्या पार्श्वभूमिवर गडकरींनी हे वक्तव्य केले आहे.

गडकरी पुढे म्हणाले, की कधीही आम्ही जात, धर्माधारित राजकारण केले नाही. नेहमीच सेवा आणि गरिबांच्या विकासाचे आम्ही राजकारण केले. कारण, गरीब हा गरीबच असतो. तो मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध, ख्रिश्चन, दलित किंवा आदीवासी असो. विकासाच्या बाबतीत दुजाभाव होऊ शकत नसल्याचे गडकरी म्हणाले. ते पुढे म्हणाले, की आमच्यासोबत जे विकासाच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाहीत, लोकांमध्ये ते जात आणि धर्मांधतेचे विष पेरतात. पण, आमचा पक्ष सगळ्या लोकांसाठी काम करतो. मग तुम्ही आम्हाला मतदान केलेले असो की नसो.

Leave a Comment