शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदी सरकार घेणार ‘मोठा निर्णय’

narendra-modi
सरकारने खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी आता आणखी एक मोठी घोषणा करण्याची सरकारची योजना आहे, असे एका बड्या नेत्याने म्हटले आहे. केंद्र सरकार 201 9 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठा निर्णय घेणार आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी आघाडीचे नेते विरेंद्रसिंग मस्त यांनी शुक्रवारी सांगितले.
“सरकारने शेती क्षेत्र आणि ग्रामीण विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी लवकरच आणखी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला जाईल,” असे मस्त यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मात्र या योजनेचा तपशील जाहीर करण्यास मस्त यांनी नकार दिला, असे टाईम्स नाऊ वाहिनीने म्हटले आहे. कर्जमाफी ही मुक्ती शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी कायमस्वरुपी समाधान नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे भाजप शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करणार आहे. या संमेलनाच्या समापन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी संबोधित करतील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment