ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनेक विक्रमांना महेंद्रसिंह धोनीची गवसणी

mahendra-singh-dhoni
मुंबई – एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत भारतीय संघाने २-१ ने पराभव केला. भारताने मालिका विजयासह प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताला एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून देण्यात धोनीने महत्वपूर्ण कामगिरी केली. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. याबरोबरच त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.

एकदिवसीय मालिकेत धोनीने सलग ३ अर्धशतके ठोकली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५१, दुसऱ्या सामन्यात नाबाद ५५ आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद ८७ धावांची खेळी केली. त्याला या कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. हा त्याचा ७ वा मालिकावीराचा पुरस्कार ठरला. तो भारताकडून सर्वाधिक मालिकावीराच्या पुरस्कार पटकावण्याच्या बाबतीत आता कोहली, युवराज आणि गांगुलीबरोबर संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आला आहे. सचिन यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्याने १५ वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे.

धोनीने सर्वाधिक वेळा धावांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या बाबतीत पॉन्टिंगला मागे टाकले आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाच्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८७ धावांची खेळी केली. पॉन्टिंगने त्याच्या कारकिर्दीत १११ सामन्यांत संघाला आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून दिला आहे. त्याला धोनीने मागे टाकताना आता ११२ वेळा यशस्वी पाठलाग केला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर १२७ सामन्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

धोनी ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामन्यांत १ हजार धावा करणारा केवळ चौथा भारतीय ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाच हा पराक्रम करता आला आहे. धोनी सर्वाधिक मालिकावीराच्या पुरस्कार पटकावणाऱ्या यष्टीरक्षकाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियात मिळालेला मालिकावीराचा ७ वा पुरस्कार ठरला. यष्टीरक्षकांच्या बाबतीत कुमार संगाकारा ५ आणि अॅडम गिलख्रिस्टला ३ वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे.

धोनी मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा भारताचा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला. धोनीचे पुरस्कार स्वीकारताना वय ३७ वर्ष आणि १९५ दिवस एवढे होते. याआधी सुनिल गावस्कर यांना १९८७ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ३७ वर्षे १९१ दिवशी मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता.

Leave a Comment