आयफोन एक्स, आयफोन एक्सआरच्या किमती यंदा कमी होणार – विश्लेषकांचा दावा

iphone
चीनमध्ये स्मार्टफोनच्या बाजारपेठेत मंदी आल्यामुळे अॅपलच्या आशियातील अनेक पुरवठादारांनी 2019 साठीचे आपले अंदाज कमी केले आहेत. त्यामुळे यंदा अॅपल आयफोनच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज विश्लेषकांनी केला आहे.

चिनी स्मार्टफोन उत्पादकांकडून वाढती आवक आणि अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी वाढती मागणी यामुळे आयफोनच्या विक्रीत लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. चिनी स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आयफोनची विक्री घटली आहे. त्यामुळे अॅपलच्या आशियातील अनेक पुरवठादारांनी आपले अंदाज कमी केले आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आयफोनमधील व्हायब्रेशन मोटार्सची पुरवठादार कंपनी असलेल्या निडेक या कंपनीने यंदा वार्षिक महसूलात मोठी घट अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वी तैवानमधील तैवान सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (टीएसएमसी) या चिपमेकर कंपनीनेही असाच अंदाज केला होता. खुद्द अॅपलनेही या महिन्यात आपल्या पहिल्या तिमाही कमाईचे अंदाज बदलले होते, असे निक्केई एशियन रिव्ह्यू या जपानी संकेतस्थळाने म्हटले आहे.

आयफोनच्या नवीन मॉडेलच्या महागड्या किमतींमुळे या फोनची मागणी कमी झाली असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत अॅपल आयफोन एक्सआरची किंमत कमी करणार असल्याचे भाकीत केले आहे.

Leave a Comment