अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यात भारत जगात सर्वात पुढे

mb
भारत हा आतापर्यंत स्मार्टफोनचा जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ होती. आता अँड्रॉईड प्ले स्टोरवरून अॅप डाऊनलोड करण्यात तो जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे.

अॅप अॅनी या बाजारपेठेच्या माहितीचे विश्लेषण आणि अॅपचे विश्लेषण करणाऱ्या कंपनीने ही माहिती जाहीर केली आहे. स्टेट ऑफ मोबाईल 2019 नावाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ब्राझिल आणि अमेरिका हे देश या यादीत भारताच्या खालोखाल ठरले आहेत.

गेल्या दोन वर्षांत आयओएस आणि अँड्रॉईड उपकरणांत अॅप डाउनलोड करण्यात भारताने 165% वाढ नोंदविली आहे. मात्र यापैकी बहुतेक अॅप विनामूल्य आहेत. अॅपवर खर्च करण्याच्या बाबतीत भारताला पहिल्या दहा देशांमध्येही स्थान नाही, असे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार गेल्या दोन वर्षांत जागतिक स्तरावर अॅप डाऊनलोडमध्ये केवळ 35%नी वाढ झाली आहे. या दोन प्लॅटफॉर्मवर चीन सर्वात मोठा डाऊनलोडर ठरला. जगातील एकूण डाऊनलोडच्या 50% डाऊनलोड चीनमध्ये झाले.

भारतात व्हाट्सअॅप अॅपच्या डाऊनलोडमध्ये मागील 24 महिन्यांत 30 टक्के वाढ झाली असून त्याने लोकप्रियतेत फेसबुकला मागे टाकले आहे. याशिवाय शेअरचॅट, फेसबुक मेसेंजर, ट्रूकॉलर, एमएक्स प्लेयर, यूसी ब्राउजर, इन्स्टाग्राम, अॅमेझॉन यांवरही सक्रिय मासिक वापरकर्त्यांची मोठी संख्या नोंदली गेली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment