मार्चमध्ये जाहीर होऊ शकते लोकसभा निवडणुकांची घोषणा

election
नवी दिल्ली – मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगामी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या तारीख जाहीर करण्यात येतील, अशी माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

६ ते ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडेल, असेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच निवडणुकांच्या तारीख मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरूणचाल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुका आटोपण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. मात्र, नुकत्याच विसर्जित झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेबद्दल अजून निर्णय होऊ शकलेला नाही. नोव्हेंबर २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित करण्यात आली होती. यानंतर सहा महिन्यांच्या आतमध्ये याठिकाणी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. सहा वर्षांचा अपवादात्मक कार्यकाळ असलेली जम्मू-काश्मीर १६ मार्च २०२१ रोजी विसर्जित होणार होती.

Leave a Comment