मुंबई पोलिसांना मिळाले पाच नवे चलाख शिपाई

belgium
थोडे खोडकर पण प्रशिक्षण दिल्यावर खूपच मददगार ठरतील असे पाच नवे शिपाई मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. अमली पदार्थ आणि स्फोटके अचूक शोधून मोठ्या दुर्घटना टाळण्यास हे नवे शिपाई दल अतिउपयुक्त ठरणार आहे. हे शिपाई म्हणजे दुसरेतिसरे कुणी नसून बेल्जियम मेलेनोइस ब्रीडची कुत्र्याची १५ दिवसांची पाच पिले आहेत. द. मुंबई पोलीस डॉग स्क्वाडमध्ये गुरुवारी ती दाखल झाली आहेत.

या विषयी अधिक माहिती देताना मुंबई पोलीस कमिशनर सुबोध जयस्वाल म्हणाले या ब्रीडची कुत्री खूप मेहनती, उत्साही आणि अतिशय चाणाक्ष असतात. ती दीर्घ काळ काम करू शकतात. आम्हाला त्यांची गरज होतीच. सध्या पोलीस डॉग स्क्वाड कडे सध्या लेब्रेडोर आणि डॉबरमन जातीची कुत्री आहेत.

बेल्जियम मेलेनोइस जातीची कुत्री सुरक्षेच्या दृष्टीने खूप ठिकाणी वापरली जात असून त्यांची घाणेन्द्रिये अतिशय तीक्ष्ण असतात त्यामुळे वास घेण्याची त्यांची क्षमता प्रचंड असते. ती हुशार असतात. एनएसजी कमांडो आणि आर्म्ड फोर्सेसच्या के ९ स्क्वाडमध्ये हीच ब्रीड वापरली जाते. या पिलांना १८ महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि नंतर ती काम सुरु करतील. या पिलांची किंमत प्रत्येकी ७५ हजार रु. आहे.

Leave a Comment