बराक ओबामा- मिशेल यांच्या फोटोवर लाईकचा पाउस

michell
राजकरणाच्या पटावर नसतानाही माजी अध्यक्ष बराक ओबामा पुन्हा एकदा त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सतत दोन वेळा सांभाळणारे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आजही अमेरिकेत लोकप्रिय नेते आहेत. ते राजकारणापासून दूर असले तरी आजही अमेरिकन राजकारणी नेत्यापेक्षा ते अधिक चर्चेत असतात. मिशेल आणि बराक ही जोडी लोकप्रिय राजकीय जोडप्यांपैकी एक आहे.

बराक ओबामा यांनी मिशेलबद्दलचे प्रेम वेळोवेळी जाहीरपणे व्यक्त केले आहे. मिशेलच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त ओबामा यांनी दोघांचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर करून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मिशेल यांना दिल्या आहेत. ट्विटरवर या फोटोला ११.६ लाख तर इन्स्टाग्रामवर ४७ लाख लाईक मिळाले आहेत.

Leave a Comment