चीनच्या चोंगकिंगमध्ये उंच इमारती जोडणारा कॉरिडोर

corridor
चीनच्या चोंगकिंग शहरात राफेल्स सिटी कॉम्प्लेक्स मध्ये २५० मीटर उंचीच्या चार इमारती जोडणारा कॉरिडोर बांधला जात आहे. यामुळे या इमारती आपसात जोडल्या जातील. हा कॉरिडॉर ३२.५ मीटर रुंद, २६.५ मीटर उंच असून येथून शहराचे विहंगावलोकन करता येणार आहे.

या कॉरिडोरमध्ये स्विमिंग पूल, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. हा कॉरिडोर चीनच्या सुप्रसिद्ध नद्या यांगत्से आणि जियालिंग यांच्या संगमावर असून मोशे सफ्ती या आर्किटेक्टने त्याचे डिझाईन तयार केले आहे.

याच आर्किटेक्टने सिंगापूरच्या मरीना बीच वरील मरीना बे सँडस हॉटेल वर असाच २०० मिटर उंचीवर ५५ मजली ३ इमारती जोडणारा स्विमिंग पूल बांधला असून येथे येणाऱ्या पर्यटकांचे ते मुख्य आकर्षण बनले आहे.

Leave a Comment