ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट मैदानाला मिळणार नवे रूप

lords
इंग्लंडमधील क्रिकेटपंढरी समजले जाणारे ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट मैदान जुनी कात टाकणार आहे. २०५ वर्षे जुन्या या मैदानाचा कायापालट केला जाणार असून त्यासाठी ४५० कोटी खर्च येणार आहे. या मैदानाची मालकी मेरीलीबोन क्रिकेट क्लबकडे असून या मैदानाची आसन क्षमता वाढविण्यासाठी करावयाची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव गेली दोन वर्षे प्रलंबित होता त्याला आता मंजुरी मिळाली आहे.

यंदाच्या मे – जून मध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आणि त्यानंतरच्या अशेस मॅचेस पार पडल्यावर हे काम सुरु होणार आहे. एल्द्रीच आणि क्रॉम्पटन या दोन मैदानाचे मुख्य आकर्षण असलेल्या स्टँडसची दुरुस्ती केली जाणार असून येथील आसन क्षमता ४ हजारांनी वाढविली जाणार आहे. त्यामुळे या मैदानाची आसन क्षमता सध्याच्या २७ हजारावरून ३१ हजारावर जाणार आहे. हे दोन स्टँडस मिडिया सेंटरच्या दोन्ही बाजूला असल्याने ते मुख्य आकर्षण बनले आहेत. येथे केटरिंग, व्हीलचेअरची सुविधा दिली जात असून नूतनीकरणाचे काम २०२० पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

Leave a Comment