आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम जवळच्या निसर्गसुंदर अरकु व्हॅली येथे तीन दिवसांच्या हॉट एअर बलून फेस्टिव्हल १८ जानेवारीला सुरु झाला असून तो २० जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. थंडीच्या दिवसात दरवषी हा महोत्सव येथे साजरा केला जातो. आंध्र प्रदेश पर्यटन विभागातर्फे त्याचे आयोजन केले जाते.
अरकु व्हॅलीत हॉट एअर बलून फेस्टिव्हल सुरु
अरकु व्हॅली हा अतिशय निसर्गसंपन्न प्रदेश असून यंदाच्या महोत्सवात विविध १५ देशातील हॉट एअर बलून पाहता येणार आहेत आणि त्यातून सैर करण्याचा आनंद लुटता येणार आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या राईड पर्यटकांना घेता येणार आहेत. यंदा २० हॉट एअर बलून आणि त्यांचे पायलट येथे आले असून त्यात भारताबरोबर युएसए, इटली, फ्रांस, स्वित्झर्लंड, बेल्जियम, स्पेन, मेल्षीय, नेदरलँड्स, ब्राझील आणि जपान देशांचा समावेश आहे.