ग्रुप कॉलिंगासाठी व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट

wtapp
व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी नेहमी नवनवीन फीचर्स आणत असते. व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलिंगचे फीचर्स आणले होते. या फीचर्सच्या मदतीने यूजर्सना आपल्या ग्रुपमध्ये वॉइस आणि व्हिडिओ फोन करता येऊ शकत होते. या फीचर्सनंतर कंपनीने नवीन अपडेट आणली आहे. हे फीचर्स अपडेट केल्यानंतर ग्रुप कॉलिंग आणखीन सोपे आणि मजेशीर होईल.

याआधी ग्रुप कॉलिंग कॉल करणाऱ्यासाठी यूजर्सना एक-एक अॅड करावे लागत होते. आता व्हॉट्सअॅपने अँड्रॉइड अॅपसाठी नवीन अपडेट आणले आहे. यामध्ये ग्रुप कॉलिंगसाठी एक वेगळे बटण आणले आहे. यामुळे ग्रुप कॉलिंग कॉलसाठी यूजर्स एकाच वेळी ग्रुपमध्ये सर्वाना अॅड करु शकते. पहिले हे फीचर्स IOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. परंतु आता हे अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले आहे.

या नविन फीचर्सचा वापर करण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअॅप अँड्रॉइडचे लेटेस्ट स्टेबल वर्जन डाउनलोड करावे लागेल. त्यासाठी गूगल प्ले स्टोरवर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल.

Leave a Comment