सध्या अनुराग बसू यांच्या ‘लाईफ इन ए मेट्रो’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव काम करीत आहे. त्याने या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्यासोबत यात ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख सहकलाकार आहे. पोस्टमध्ये राजकुमारने लिहिले आहे की, “लवकरच तुमच्यासमोर येत आहे. तोपर्यंत एक झलक, असे म्हणत त्याने फोटो पोस्ट केला आहे.
राजकुमार रावने पोस्ट केला ‘लाईफ इन ए मेट्रो’च्या सिक्वलचा फोटो
बहुत जल्दी सामने आयेंगे आप लोगों के। तब तक के लिए एक झलक। #AnuragBasu sir’s next with @fattysanashaikh pic.twitter.com/hL7ocqpOXO
— Rajkummar Rao (@RajkummarRao) January 17, 2019
राजकुमार राव हा फोटोमध्ये मिथून चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील आयकॉनिक स्टेप करताना दिसत आहे. ८० च्या दशकातील वेशभूषेत फातिमा आणि राजकुमार दिसत आहेत. तो सीक्वलमध्ये मिथूनचा चाहता असावा असे फोटो पाहून वाटते. पहिल्यांदाच राजकुमार राव आणि फातिमा सना शेख स्क्रिन शेअर करीत आहेत. या दोघांशिवाय ‘लाईफ इन ए मेट्रो’च्या सीक्वलमध्ये अभिषेक बच्चन याचीही महत्त्वाची भूमिका आहे.