अंतराळवीराने केला एक फोन आणि नासामध्ये उडाली धांदल

nasa
अंतराळात असलेल्या एका डच अंतराळवीराने तेथून फोन केला आणि त्या एका फोनमुळे नासातील ह्यूस्टन बेसमध्ये सर्वांची धांदल उडाली. तिथे उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांची झोप उडाली. आता तुम्हाला वाटेल की त्या एका फोनमुळे असे झाले तरी काय…

खरतर त्या फोनवरुन नाही तर फोनच्या क्रमांकमुळे सर्व घाबरुन गेले. कारण ज्या क्रमांकावरुन फोन आला होता तो आपत्कालीन क्रमांक होता. या क्रमांकवर फोन येणे याचा अर्थ असा की, यानामध्ये काहीतर तांत्रिक बिघाड निर्माण होणे. त्यामुळे या क्रमांक वरुन फोन येताच सर्वाची धांदल उडाली आणि नेमकी कोणता बिघाड झाला आहे याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

जेव्हा यानामधून इमर्जन्सी फोन आला तेव्हा शास्त्रज्ञांना वाटले की, स्पेसशिपमध्ये काही बिघाड झाला आहे. सर्व शास्त्रज्ञ काय बिघाड झाला आहे याचा शोध घेऊ लागले. तेव्हा समजले की स्पेसमधून कोणताही बिघाड झाला नसून चुकीचा क्रमांक लावल्यामुळे सर्व गोंधळ झाला आहे.

विमानात उपस्थित असलेल्या नेदरलँडचे अंतराळवीर आंद्रे कुईपर हे उपग्रह फोनद्वारे फोन करीत होते. त्यासाठी त्यांनी निर्धारित क्रमांक 9011 डायल करीत होते, परंतु गुरुत्वाकर्षण किंवा इतर समस्यामुळे, शून्य नंबर गायब झाला आणि फोन 911 यावर लागला.  911 हा क्रमांक आपत्कालीन नंबर आहे.

फॅक्स न्यूजनुसार, अंतराळवीर कुईपरने मान्य केले की माझा कडुन चुकून नंबर लागला. ते स्पष्टीकरण देताना म्हणाले की, स्पेसवरून फोन करण्यासाठी विशेष कोड लागतो. यासाठी पहिल्यांदा 9 दाबावे लागते आणि नंतर 011  कोड टाकावा लागतो. जेव्हा फोन लावला तेव्हा कदाचित गुरुत्वाकर्षणमुळे शून्य दाबले गेले नाही आणि 9011 ऐवजी 911 वर फोन लागला.

Leave a Comment