बिल गेट्सकडून भारत सरकारच्या आयुष्मान योजनेचे कौतुक

Bill-Gates
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान योजनेचे कौतुक मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. या योजनेला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त गेट्स यांनी या योजनेला दाद दिली आहे.

“आयुष्मान भारत योजनेचे पहिले 100 दिवस पूर्ण केल्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. आतापर्यंत या योजनेद्वारे किती लोकांना फायदा मिळाला, हे पाहणे भारावून टाकणारे आहे,” असे बिल गेट्स यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी दिलेल्या माहितीला प्रतिसाद म्हणून बिल गेट्स यांनी हे अभिनंदन केले आहे. या मोफत आरोग्य सेवा योजनेच्या पहिल्या 100 दिवसांत 6,85,000 लाभार्थ्यांनी तिचा लाभ घेतला आहे आणि ही संख्या वेगाने वाढत आहे, असे नड्डा यांनी ट्विट केले होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रोस गेहेबरेयसस ही 3 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी आणि आरोग्य मंत्र्यांची प्रशंसा केली होती. “आपल्या पहिल्या 100 दिवसांमध्ये भारताच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेने सुमारे 700,000 लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली आहे. सर्वांसाठी आरोग्यासाठी दूरदर्शी नेतृत्व दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे कौतुक करतो,” असे गेहेबरेयसस ट्विटमध्ये म्हणाले होते.

Leave a Comment