बनावट वेबसाइट्सकडून लोगोचा वापर – अमूलची गुगलला नोटीस

google
दुग्धोत्पादन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी अमूलचा ट्रेडमार्क असलेली बनावट संकेतस्थळे दाखवून गुगल पैसे कमावत असल्याचा आरोप करून अमूलने गुगलला नोटीस पाठविली आहे. अमूलची बनावट आणि फसवी संकेतस्थळे दाखविणे गुगलने थांबवावे आणि रोखावे, असे कंपनीने गुगलकडे मागणी केली आहे.

गुगल इंडियाच्या बंगळुरु कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेल्या कायदेशीर नोटिशीत म्हटले आहे, की अज्ञात व्यक्तींनी अमूल नावाची बनावट संकेतस्थळे आणि ई-मेल तयार केले आहेत.
amul
“मार्च 2018 पासून अशिलाला लोकांकडून या बनावट आणि फसव्या वेबसाइट्स / डोमेन नावांबद्दल असंख्य तक्रारी आल्या आहेत. कारण ही बनावट आणि फसवी संकेतस्थळे लोकांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगत आहेत,” असे या कायदेशीर नोटिशीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत, असे गुगलच्या प्रवक्त्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
google.jpg1

गुगलच्या जाहिरातीच्या सेवा अशा खोडसाळ लोकांना त्यांची पार्श्वभूमी तपासल्याशिवाय आपली पेड प्रोमोशन सेवा वापरू देत आहे आणि या प्रक्रियेत क्लिक-आधारित जाहिरातींमधून कमाई करत आहेत, असा आरोप अमूलने केला आहे. कंपनीने या नोटिशीत बनावट संकेतस्थळांची यादीही जोडली आहे.

Leave a Comment