पंतप्रधान मोदींची कपडे खरेदी

kharedi
तीन दिवसांच्या गुजराथ दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अहमदाबाद शॉपिंग फेस्टिवलचे उद्घाटन केले आणि गुजराथ खादी ग्रामोद्योग बोर्डाच्या स्टॉलवरून काही कपडे खरेदी केले. या खरेदीचे बिल त्यांनी रुपे कार्डने दिले. या प्रसंगाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून अनेकांकडून त्याला पसंती मिळाली आहे. दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर हा अहमदाबाद फेस्टिवल सुरु करण्यात आला आहे.

मोदींच्या खरेदीमुळे आणि त्यांनी खरेदीचे पैसे चुकते केल्यामुळे स्टॉलवरील कर्मचारी उत्साहात होते. मोदी यांनी येथून काही जाकिटे खरेदी केली. २०१६ साली नोटबंदी पुकारल्यावर मोदी यांनी नागरिकांना खरेदी करताना कॅशलेस खरेदी करण्याचे आवाहन केले होते तसेच मन कि बात कार्यक्रमात त्यांनी खादीच्या कपडे खरेदी करण्याचा आवाहन केले होते. यामुळे विनाकराना मदत मिळणार असल्याचे सांगितले होते. गुरुवारी स्वतःसाठी खरेदी करताना मोदी यांनी हेच मार्ग वापरले त्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.

शुक्रवारी मोदी व्हायब्रंट गुजराथ इन्व्हेस्टर्स समिटचे उद्घाटन करत असून देशातील तमाम उद्योग घराणी या परिषदेत सामील झाली आहेत.

Leave a Comment