किन्नरांची कुलदेवता बहुचरा माता

kinnar
प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्यात यंदा प्रथमच किन्नर आखाड्याची शाही मिरवणूक निघाली आणि या साधुनी शाही स्नानही केले. हे स्नान सुरु होण्याअगोदर त्यांनी अर्धनारीनटेश्वर स्वरूप आणि कुलदेवी बहुचरा माता यांना स्नान घातले आणि मग साधुनी स्नान केले. किन्नरांची कुलदेवी असलेल्या बहुचरा मातेचे स्थान गुजराथेतील मेहसानापासून जवळ असलेल्या बेचराजी भागात आहे. या मंदिरात देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे अपत्यहिन जोडपी येथे संतान प्राप्तीसाठी नवस बोलतात.

bahuchara
या देवीने अनेक दुष्ट राक्षसानं मारून त्यांचे भक्षण केल्याने तिला बहुचरा असे नाव पडले आहे. या मंदिरात किन्नर विशेष पूजा आणि अनुष्ठाने करतात. या देवीचे वाहन कोंबडा आहे. देवीबाबत अशी कथा सांगितली जाते, एका राजाने त्याला संतान व्हावे म्हणून देवीची उपासना केली आणि त्याला मुलगा झाला. मात्र तो नपुसंक होता. तेव्हा देवीने या मुलाच्या स्वप्नात येऊन मोक्ष मिळविण्यासाठी गुप्तांग समर्पित करण्याचे सांगितले. त्यानुसार राजकुमाराने देवीची उपासना केली आणि मोक्ष मिळविला. त्यामुळे किन्नर या देवीला कुलदेवी मानतात.

देवीचे वाहन कोंबडा असून या विषयी एक आख्यायिका सांगितली जाते. अल्लाउद्दिन याने पाटण जिंकल्यावर हे मंदिर तोडण्यासाठी कूच केली. मंदिराभोवती कोंबड्या होत्या. अल्लाउद्दिनच्या सैनिकांनी त्या पकडून मारल्या आणि खाल्ल्या. त्यातील एक कोंबडा या पकडीतून वाचला. पहाट होताच हा कोंबडा आरवला तेव्हा सैनिकांच्या पोटातून आरवल्याचे आवाज येऊ लागले आणि कोंबड्या सैनिकांची पोटे फाडून बाहेर पडल्या. या प्रकाराने घाबरून अल्लाउद्दिन मंदिर न फोडताच पळून गेला.

Leave a Comment