व्हेटिकन सिटीचा संघ प्रथमच ऑलिम्पिक मध्ये येणार

vetican
जगभरातील कॅथोलिक चर्चचे मुख्य केंद्र व्हेटिकनने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून प्रथमच त्यांच्या क्रीडा संघाची घोषणा केली आहे. ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये ऑलिम्पिक पात्रता गाठणे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी ६० खेळाडूंचे पथक तयार केले गेले आहे. यात पाद्री, नन्स बरोबर स्विस गार्ड, दवाखाना चालविणारे कर्मचारी, प्रोफेसर्स सामील आहेत.

इटलीतील ऑलिम्पिक कमिटी बरोबर व्हेटिकनने स्वतंत्रपणे स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात नुकताच करार केला आहे. व्हेटिकनच्या पथकात सर्वात मोठे खेळाडू ६२ वर्षाचे असून ते प्रोफेसर आहेत. हे पथक प्रथम छोट्या स्पर्धात सहभागी होणार आहे. १० लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशासाठी होणाऱ्या युरोपच्या गेम ऑफ स्मॉल स्टेट्स आणि मेडिटेरीअन गेम्स मध्ये हे पथक खेळणार आहे.
व्हेटिकनच्या क्रीडा आणि संस्कृती विभागाचे अध्यक्ष मेलयोर होसे सांचेज म्हणाले ऑलिम्पिक स्पर्धेत अन्य देशांप्रमाणे आमच्या देशाचा झेंडा फडकावा असे आमचे स्वप्न आहे. याच्या माध्यमातून आम्ही संस्कृती प्रचार करणार आहोत. तसेच वर्णद्वेषविरोधात लढणार आहोत. आमच्या संघात दिव्यांग खेळाडू आहेत तसेच दोन विदेशी स्पर्धकही आहेत.

Leave a Comment