रिलायंसला विक्रमी १० हजार कोटी निव्वळ नफा

jionafa
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी रिलायंस इंडस्ट्रीजने १०२५१ कोटींचा निव्वळ नफा कमावला असून रिलायंस ही कामगिरी करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. आकडेवारीनुसार रिलायंसच्या वार्षिक आधारावरील नफ्यात ९ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी कंपनीने ९४२० कोटी नफा मिळविला होता.

तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ५६ टक्के वाढ झाली असून कंपनीचा महसूल १७१,३३६ कोटींवर गेला आहे. डिसेंबर तिमाहीत रिलायंस टेलिकॉम जिओने ८३१ कोटींचा नफा मिळविला आहे. यासंदर्भात बोलताना अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओचा प्रवास शानदार होत असून आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण होत आहेत असे सांगितले. ते म्हणाले सध्या जिओचे २८ कोटी सबस्क्रायबर असून जगातील मोठी डेटा नेटवर्क कंपनी बनण्याच्या दिशेने जिओ वेगाने वाटचाल करत आहे.

Leave a Comment