ऋषभ पंतची लेडी लक इशा नेगी

isha
ऑस्ट्रेलियन टेस्ट सिरीज मध्ये सर्वाधिक चर्चा झालेला भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत याने त्याचे लेडी लक म्हणजे जिवाभावाची सखी इशा नेगी हिच्यासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केले असून ईशानेही हा फोटो तिच्या अकौंटवर शेअर केला आहे. इशा इंटेरीअर डेकोरेटर आणि डिझायनर आहे.

उत्तराखंडचा २१ वर्षीय ऋषभ सध्या सुट्टीवर असून सोशल मिडीयावर तो फोटो शेअर करत आहे. इशासोबतच्या फोटोसोबत त्याने मी तुला आनंदी ठेऊ इच्छितो कारण तू माझ्या आनंदाचे सर्वात मोठे कारण आहेस असा मजकूर दिला आहे तर ईशाने फोटोसोबत माझा साथी, माझा हमसफर, माझा जवळचा मित्र आणि माझे प्रेम असा मजकूर दिला आहे. ऑस्ट्रेलियात शतक ठोकल्यावर ऋषभने आईसह त्याचा फोटो शेअर केला होता.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत ऋषभ मैदान आणि मैदानाबाहेरही चर्चेत राहिला होता. त्याने कसोटी मालिकेत ३५० धावा काढल्या. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनीही त्याचे कौतुक केले होते. ऋषभ या काळात खूप क्रिकेट खेळला आहे त्यामुळे त्याला आरामाची गरज आहे. बीसीसीआयने त्यासाठी त्याला सुटीवर पाठविले आहे त्यामुळे तो वनडे सिरीज मध्ये खेळत नसून मायदेशी परतला आहे.

Leave a Comment