अलिशान हॉटेल? छे,छे ! हे आहे स्मार्ट पोलीसस्टेशन

policest
गुजराथेतील सुरत हे शहर देशाची हिरेनगरी म्हणून ओळखले जातेच. या शहराची आणखीएक नवी ओळख होत असून येथे देशातील पहिले स्मार्ट पोलीसस्टेशन बांधले गेले आहे. ३० जानेवारीला हे स्टेशन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या स्टेशनचे देशाला समर्पण केले जाणार आहे. लांबून एखाद्या हॉटेलप्रमाणे दिसणारे हे स्टेशन अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून ४० हजार चौरस फुटांचे आणि तीन मजली आहे.

तुरुंगातील कैद्यांना कश्या आणि कोणत्या सुविधा हव्यात याची चर्चा नेहमीच होते. गुजराथ पोलिसांनी या स्टेशनआमध्ये कैद्यांवर सुविधांचा वर्षाव केला आहे. कातरगाम भागात असलेले हे स्टेशन वायफाय युक्त आहेच शिवाय ते वातानुकुलीत आहे. येथील पोलिसांना सर्वसामान्य जनता आणि कैदी यांच्याबरोबर विनम्र वर्तणुकीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. कैदी भेटीला येणाऱ्यासाठी खास व्यवस्था केली गेली आहे. सोफे आणि डिझायनर खुर्च्या, टीव्ही, पुस्तके असलेली वेटिंग रूम बनविली गेली आहे. हे स्टेशन पूर्णपणे सोलर एनर्जीवर चालणार असून देशातील पहिलीचे सोलर पोलीस स्टेशन आहे.

संपूर्ण स्टेशनवर सीसीटीव्हीचा पहारा आहे. स्मोक डिटेक्शर लावले गेले असून लहान मुलांच्या मनात पोलीशांची भीती राहू नये याची काळजी घेतली गेली आहे. येथे मुलांसाठी चाईल्ड कॉर्नर असून तेथे खेळणी आणि गेम्स आहेत. ज्येष्ठ लोकांसाठी दोन खास लिफ्ट बसविल्या गेल्या अशे. टेरेसवर अत्याधुनिक जिम असून तेथे पैसे भरून सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

या पोलीसस्टेशनच्या देखभालीचा खर्च कॅन्टीन आणि दुकाने भाडे तत्वावर देऊन भागविला जाणार आहे.

Leave a Comment