
मुंबई : प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची घोषणा केल्यामुळे ‘विंडोज 7’ चे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. मायक्रोसॉफ्टकडून मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
2020 पासून मायक्रोसॉफ्ट बंद करणार ‘विंडोज 7’चा सपोर्ट
विंडोज 7 चा सपोर्ट 14 जानेवारी 2020 पासून बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ तुम्हाला विंडोज 7 चे अपडेट्स मिळणार नाहीत. सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही या अपडेट्समध्ये समावेश आहे. संगणकाची या दोन्हीमुळे सुरक्षा होत असते.
विंडोज 7 चा अधिकृत फोरम सपोर्ट गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने जून महिन्यातच बंद केला होता. मायक्रोसॉफ्टने सात जुलै 2009 रोजी Windows 7 सादर केले होते. विंडोज 7 नंतर Windows 8 , Windows 8.1 आलं. जुलै 2015 मध्ये Windows 10 लाँच करण्यात आलं. सध्या विंडोज 10 वापरणाऱ्या यूझर्सची संख्या 70 कोटींहून जास्त आहे.
कंपनी आता Windows 7 Extended Security Updates विकणार आहे. ही सुविधा सुरु ठेवायची असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील. अनेक वर्षांपासून एंटरप्राइजेस युजर्स विंडोज 7 चा वापरत असल्यामुळे त्याचा वापर एकदम बंद करणे कठीण आहे. हे अपडेट सामान्य ग्राहकांना मिळणार नाहीत. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी Windows XP आणि Vista चाही सपोर्ट बंद केला आहे.
