वायू प्रदूषणासाठी ‘फॉक्सवॅगन’च कारणीभूत; राष्ट्रीय हरित लवादा

wollkaswagane
जर्मनीची कार निर्मिती करणारी कंपनी ‘फॉक्सवॅगन’ ला राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) ४ सदस्यीय कमिटीने वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरविले आहे. कंपनीवर लोकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा ठपकाही समितीने ठेवला आहे. चुकीचे सॉफ्टवेअर वापरल्याबद्दल दिल्लीशी संबंधित वायू प्रदूषण संदर्भात १७१.३४ कोटी रुपयांचा दंड आकारण्याची मागणीही समितीने केली आहे.

राष्ट्रीय हरित लवादा कमिटीच्या अहवालानुसार सन २०१६ मध्ये जवळपास ४८.६७८ टन नायट्रोझन ऑक्साईड (NOx) चे ‘फोक्सवॅगन’ च्या कारमधून उत्सर्जन झाले, दिल्लीच्या हवेत जे मिसळल्यामुळे दिल्लीतील लोकांच्या स्वास्थ्यावर या विषारी वायुचा झालेला परिणाम लक्षात घेता अंदाजे १७१.३४ कोटी रुपयांचा दंड होतो, असे अहवालात म्हटले आहे. सध्या असे कोणतेच तंत्रज्ञान नाही जे नायट्रोझन ऑक्साईडने वातावरणाचे किती नुकसान झाले आहे याचे मोजमाप करू शकणार. त्यामुळे समितीने अंदाजे ही दंडाची किंमत ठरवली आहे.

दिल्लीत वायू प्रदूषणामुळे झालेली एकूण आरोग्य हानीची अंदाजे रक्कम १५७.८० कोटी रुपये आहे. मात्र दंड २०१६ ते २०१८ पर्यंत आकारण्यात येत आहे. त्यामुळे दंड वाढून १७१.३४ कोटी रुपये करण्यात आला आहे. नायट्रोझन ऑक्साईडच्या संपर्कात अधिक आल्याने श्वासासंबंधी रोग होतात. यामध्ये दम्याच्या त्रासाचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच श्वासाशी संबंधित संसर्गचा धोकाही उद्भवतो.

‘फोक्सवॅगन’ ने वर्ष २०१५ मध्ये ३,२३,७०० वाहनांना रिकॉल केले होते. भारतातील उत्सर्जन मानक BS-IV च्या तुलनेत जवळपास १.१ ते २.६ टक्क्याने ही वाहने जास्त उत्सर्जन करत होती. ही माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे काही मॉडेल्सवर करण्यात आलेल्या चाचणीच्या माध्यमातून समोर आली आहे. कंपनीने ही बाब त्यावेळी मान्य केली होती की त्यांनी ११ मिलियन डिझेल वाहनांमध्ये चुकीचे डिवाईस वापरले होते आणि या वाहनांची विक्री युएस, युरोप आणि अनेक ग्लोबल मार्केटमध्ये करण्यात आली होती.

Leave a Comment