गणित सोडवा आणि लग्नाला या !

married
तुम्हाला जर कोणी म्हटले की लग्नाला यायचे असेल तर आधी गणिताची परीक्षा द्यावी लागेल मग तुम्ही काय कराल ? एक असाच लग्न सोहळा होत आहे. या लग्नात चक्क गणिताची परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. तुम्हाला वाटेल की असा लग्न सोहळा का आयोजित केला असेल. तर यामागील कारण आहे की, या लग्न सोहळ्यातील वर आणि वधु दोघे ही गणित तज्ञ आहे. या लग्नातील वधूने स्वत: सोशल मीडियावर आपल्या योजनेची घोषणा केली आहे. यात तिने म्हटले आहे की लग्नात येणा-या सर्व पाहुण्यांना गणिताचे काही प्रश्न सोडवावे लागणार आहेत.

एका अज्ञात फेसबुक पेजवर वधूने एक पोस्ट केली आहे. यामध्ये वधूने तिच्या लग्नाच्या सर्व आयोजना बद्दल माहिती दिली आहे. या पोस्टनुसार लग्नात गणिताचीच चर्चा होईल असे वाटते. या भावी वधूने आपल्या पोस्टमध्ये हे देखील सांगितले आहे की गणित सोडविल्यानंतर काय बक्षीस मिळेल. या पोस्टला फेसबुकवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. यावरुन असे दिसते की पाहुण्यांना ही कल्पना आवडलेली नाही.

Leave a Comment