विविध विद्यापीठातील ५ लाख तरुणांना प्रशिक्षण देणार मायक्रोसॉफ्ट

microsoft
बंगळुरू – एआयच्या (कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता) १० लॅब देशातील १० विद्यापीठात सुरू करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. ५ लाख तरुणांना मायक्रोसॉफ्टने विविध तंत्रज्ञानातून प्रशिक्षितही करण्याचा निर्णय घेतला आहे.

१० हजार डेव्हलपर्सचे येत्या तीन वर्षात कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे मायक्रोसॉफ्ट इंडियाने म्हटले आहे. भारतीय व्यवसायाची तसेच भारताच्या प्रगतीची एआयमध्ये क्षमता आहे. यामध्ये शिक्षण, कौशल्य, आरोग्य आणि कृषी क्षेत्राचा समावेश असल्याचे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांनी सांगितले.

कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेतून देशाची प्रगती साधेल, असा विश्वास मायक्रोसॉफ्टने व्यक्त केला आहे. तीन वर्षाचा ‘इंटिलिजिंट क्लाऊड हब’चा संयुक्त कार्यक्रम मायक्रोसॉफ्ट इंडियाने घोषित केला आहे. क्लाऊड टेक्नॉलिजिस आणि विद्यार्थ्यामधील एआय कौशल्य वाढविणे हा कार्यक्रमाचा हेतू आहे.

असा कार्यक्रम मायक्रोसॉफ्टने जगात प्रथमच भारतात सुरू केला आहे. मायक्रोसॉफ्ट विद्यापीठातील एआय लॅबमध्ये पायाभूत सेवा, प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणार आहे. या कार्यक्रमातून नोकऱ्या मिळविण्यासाठी कौशल्य विकास होण्यास तरुणांना मोठी मदत होणार आहे.

Leave a Comment