हार्दिकने स्वत:ला घेतले खोलीत कोंडून ; वडिलांनी दिली माहिती

hardik
बडोदा: कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्याला बीसीसीआयने याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे.

हार्दिक पांडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाही निलंबनाच्या कारवाईनंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आहे आणि कोणाचेही फोनही उचलत नाही, अशी माहिती हार्दिकचे वडिल हिमांशू पांड्या यांनी दिली आहे.

ऑस्ट्रेलियावरून परतल्यापासून त्याने घराबाहेर पाऊल टाकलेले नाही, तो कोणाच्याही फोनला उत्तर देत नाही. गुजरातमध्ये सणाचे वातावरण आहे. पण तो घरी असूनही सण साजरा करत नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

Leave a Comment