हज यात्रेवरील जीएसटीचे दर १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर

mukhtar-abbas-naqvi
नवी दिल्ली – नवी दिल्ली येथील आर. के. पुरम येथे हज विभागाचे नव्या कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी उपस्थितांसोबत बोलताना नक्वी यांनी हज यात्रेवरील जीएसटीचे दर १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आल्यामुळे हज यात्रेकरुंची अंदाजे ११३ कोटी रुपयांची बचत होईल, असे म्हटले आहे.

२ हजार ३०० हून अधिक मुस्लीम महिला मेहराम शिवाय (पुरुषांशिवाय) यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. स्वातंत्र्यांनतर ही प्रथमच वेळ आहे ज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येत महिला मेहरामशिवाय हज यात्रेला जातील. आत्तापर्यंत जवळपास २ हजार ३४० महिलांनी हजयात्रेसाठी अर्ज केलेला आहे. तर, यावर्षी लॉटरी प्रणाली शिवाय महिलांना हज यात्रेला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

विमान भाड्यातही वस्तू व सेवा करामध्ये कपात झाल्यामुळे लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे हज यात्रेची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे, असे नक्वी यावेळी बोलताना म्हणाले. मागच्या वर्षी १ हजार ३०० महिला हज यात्रेला गेल्या होत्या.

Leave a Comment