अखेर संजय राऊत यांनी ‘ठाकरे’च्या मराठी व्हर्जनमधील आवाज बदलला ?

thakre
गेल्या काही दिवसांपासून ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज बदलावा अशी मागणी जोर धरु लागली होती. जो ट्रेलर या अगोदर रिलीज झाला त्यामध्ये चित्रपटाच्या मराठी व्हर्जनमध्ये सचिन खेडेकरांचा आवाज ऐकायला मिळाला होता. तो आवाज बदलावा अशी मागणी केल्यानंतर निर्माता संजय राऊत यांनी यावर सकारात्मक विचार करणार असल्याचे म्हटले होते. आता खेडेकरांचा आवाज बदलल्याचे स्पष्ट होत आहे.

चित्रपटातील ‘कोण आला रे कोण आला’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारत असलेल्या नवाजुद्दीनच्या तोंडी या गाण्यातील दोन प्रसंगातील डायलॉग आहेत. सचिन खेडेकरांच्या आवाजातील हे दोन्ही डायलॉग नाहीत. याठिकाणी हुबेहुब बाळासाहेबांचा आवाज ऐकायला मिळतो. यामुळे हा आवाज कोणाचा असा प्रश्न पडतो.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आवाज चेतन शशीतल यांचा असल्याचे समजते. हा आवाज संपूर्ण चित्रपटात वापरला जाऊ शकतो. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून १० दिवस बाकी आहेत. दरम्यान संपूर्ण चित्रपटातील बाळासोबांचा आवाज डब होऊन त्यांचा हुबेहुब आवाज असलेल्या शशीतल यांचा आवाज ऐकायला मिळेल का ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Comment