२४ जानेवारीला होऊ शकते सीबीआयच्या नव्या संचालकांची नियुक्ती

CBI
नवी दिल्ली – सीबीआय संचालक पद सीबीआयमधील ऐतिहासिक वादंगानंतर रिक्त झाले होते. आता २४ जानेवारीला सीबीआय संचालक नियुक्त करण्यासाठी निवड समितीची बैठक होणार आहे. सीबीआय संचालकांची नियुक्ती याच दिवशी केली जाऊ शकते.

नुकतेच सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. वर्मांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीने पदावरुन बडतर्फ केल्यानंतर एम. नागेश्वर राव हे सीबीआयचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्त झाले होते. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि अतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादानंतर सीबीआयमधील वाद उघड झाला. केंद्र सरकारने यानंतर वर्मा आणि अस्थाना या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आणि एम. नागेश्वर राव यांना प्रभारी संचालक म्हणून नियुक्त केले. यानंतर आता पुन्हा सीबीआयच्या संचालक पदाची निवड करण्यासाठी २४ जानेवारीला निवड समितीची बैठक होणार आहे.

Leave a Comment