रोबोंवर ही आली नोकरी गमावण्याची पाळी

henna
जगात सर्वत्र रोबोंचा वापर वाढत चालल्याने माणसाच्या नोकरीवर गदा येतेय असा प्रचार सुरु असतानाच रोबोंवरही नोकरी गमावण्याची पाळी जपान मध्ये आली आहे. वास्ततिक जपान अनेक क्षेत्रात रोबोंचा वापर करत असून तेथे नित्य नवे रोबो तयार केले जात आहेत. मात्र जपान मधील हेना ना या हॉटेलने त्याच्या सेवेतील २४३ रोबोंपैकी निम्म्या रोबोना कामावरून कमी केल्याची बातमी द वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हेना ना या हॉटेलने २४३ रोबो विविध कामांसाठी हॉटेल मध्ये तैनात केले होते. रोबो वास्तविक काम सोपे व्हावे म्हणून ठेवले होते पण व्यवस्थापनाच्या असे लक्षात आले कि या रोबो मुळे काम सोपे होण्याऐवजी समस्या वाढत आहेत. त्यामुळे काही रोबो कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात आलेल्या पाहुण्यांना स्थानिक ठिकाणांची माहिती देण्यासाठी चुरी नावाच्या बाहुलीच्या आकाराच्या रोबांचा समावेश आहे. या रोबोनी ग्राहकाच्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित होते मात्र त्यांच्यापेक्षा सिरी, गुगल असिस्टन्ट, अलेक्सा हि उपकरणे अधिक अचूक माहिती देत आहेत.

येथे दोन रोबो चेक इन कौंटरवर नेमले गेले होते. डायनोसोरच्या आकाराचे हे रोबो आलेल्या ग्राहकांच्या कागदपत्रांच्या फोटो कॉपी काढणे, त्यांचे सामान रूममध्ये नेणे यासाठी होते. मात्र प्रत्यक्षात हे रोबो हॉटेल मधील १०० पैकी २४ रूम मध्येच सामान नेऊ शकत होते. तसेच पाउस आला, बर्फवृष्टी झाली कि ते बंद पडत होते. त्यामुळे त्यानाही कामावरून कमी केले गेले.

Leave a Comment