भाजप अध्यक्ष अमित शहाना स्वाईन फ्ल्यू, एम्स मध्ये दाखल

amitsh
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याने उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास शहा यांना हृदयात दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने एम्स मध्ये भरती करण्यात आले. स्वतः अमित शहा यांनीच त्यांच्या ट्विटर अकौंटवर ही माहिती दिली आहे. ते म्हणतात मला स्वाईन फ्ल्यू झाला आहे. उपचार सुरु आहेत. देवाची कृपा आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने लवकरच बरा होईन.

शहा यांच्या आजाराची बातमी समजताच गृहमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय मंत्री आर.के. सिंग यांनी अमित शहा यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मकरसंक्रांती दिवशी म्हणजे १४ जानेवारीला शहा गुजरात मध्ये होते आणि त्यांनी नारायणपुरा येथे पतंगोत्सवात भाग घेतला. याच मतदारसंघातून ते निवडणूक लढवितात. येत्या २० जानेवारी पासून भाजप प. बंगाल मध्ये तीन दिवस रॅलीज घेणार असून त्याचे नेतृत्व शहा करणार आहेत. शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत बंगाल मधील ४२ जागांपैकी २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Leave a Comment