नाईकेचे अॅडॉप्ट बीबी स्मार्ट शूज

nike
जगातील पादत्राणे क्षेत्रातील दिग्गज कंपनी नाईकने नवीन क्रांती घडवतील असे स्मार्टशूज अॅडॉप्ट बीबी नावाने बाजारात आणले असून हे बूट स्मार्टफोनला अॅटॅच करता येतात. कंपनीने या संदर्भात ट्विटरवर माहिती देताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे अॅडॉप्ट बीबी शूज एका अॅपच्या मदतीने कंट्रोल करता येतात. स्मार्टफोन ला अॅटॅच केल्यावर ते फोनच्या मदतीने सैल घट्ट करता येतात. तसेच हे बूट पायात घातले कि आपोआप अॅडजस्ट होतात कारण यात बसविलेले सेन्सर त्यांना ऑटोमॅटिक फिटिंग मोडवर ठेवतात.

हे बूट खास करून बास्केटबॉल खेळाडूना नजरेसमोर ठेऊन बनविले गेले आहेत. या खेळात खेळाडू पळत असताना अनेकदा बूट आपोआप खुले होतात. त्यामुळे खेळाडूना खेळताना अडचण येते. या बुटांची किंमत ३५० डॉलर्स म्हणजे २५००० रुपये आहे.

Leave a Comment