चीनने बांधला सर्वात मोठा थ्रीडी प्रिंटेड कॉंक्रीट पूल

bridge
जगातील सर्वात मोठा थ्रीडी प्रिंटेड कॉंक्रीट पूल चीनच्या शांघाय शहरात बांधला गेला असून त्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. हा पूल पादचारी पूल असून त्याची लांबी २६.३ मीटर, उंची २ मीटर तर रुंदी ३.६ मीटर आहे. हा पूल बांधण्यासाठी २,७००० युआन म्हणजे २८ लाख रुपये खर्च आला आहे.

ज्या इंजिनिअर्सनी या पुलाचे काम केले ते म्हणाले, चीन मधील प्राचीन झाओझो पुलावरून या पुलाची प्रेरणा घेतली आहे. त्यासाठी अगोदर डमी पूल तयार केला गेला आणि त्याची चाचणी घेऊन हा पूल उभारला गेला.

शांघायच्या एका पार्कमध्ये आणखी एक थ्रीडी प्रिंटेड पुलाचे उद्घाटन केले गेले असून हा १५.२५ मीटर लांब, ३.८ मीटर रुंद आणि १.२ मीटर उंच पूल ३५ दिवसात बांधला गेला. हे पूल किमान ३० वर्षे काम देतील असा दावा केला जात असून या पूलमध्ये पॉलीमरचा वापर केला गेला आहे.

Leave a Comment