एलजी व्ही ४० थिन क्यू स्मार्टफोन २० जानेवारीला भारतात

lgv40
एलजीने त्यांचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन एलजी व्ही ४० थिन क्यू भारतात २० जानेवारीला लाँच करण्याचे ठरविल्याची माहिती अमेझोन इंडिया पेजवर दिली गेली आहे. कंपनीने या बाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. २० जानेवारीपासून हा फोन फक्त अमेझोनवर विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे बॅनर अमेझोनवर प्रसिद्ध केले गेले आहे.

या फोनला ५ कॅमेरे आहेत. रिअरला तीन तर फ्रंट साईडला दोन कॅमेरे दिले गेले आहेत. रीअरच्या कॅमेऱ्यात ट्रिपल शॉट फिचर असून यामुळे एकाच वेळी तीन लेन्सने कॅप्चर केलेल्या इमेज छोट्या व्हिडीओ मध्ये परिवर्तीत होतात. १६ एमपीचा एक आणि १२ एमपीचे दोन कॅमेरे रिअर साईडवर दिले गेले आहेत. फ्रंटला ५ एमपीचा वाईड अँगल लेन्स व ८ एमपीचा स्टँडर्ड कॅमेरा आहे. ६.४ इंची फुलव्हिजन ओलेड डिस्प्ले कॉर्निंग ग्लास सह आहे. ६ जीबी रॅम, ६४,१२८ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा अशी त्याची अन्य फिचर आहेत.

या फोनची भारतातील किंमत साधारण ४५ हजार रुपये असून एचडीएफसी डेबिट क्रेडीट कार्डधारक किंवा इएमआयवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के सवलत मिळवणार आहे. शिवाय १६७५० ची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर दिली गेली आहे. जुना फोन एकस्चेंज केल्यास ५ हजार रु. सवलत मिळणार आहे.

Leave a Comment