पुणेकराने बनविली ८ सिटर सायकल बस, किंमत दीड लाख रु.

cyclebus
पेट्रोल डीझेलची वारंवार होणारी दरवाढ आणि प्रदूषणाचा गहन प्रश्न यावर एक उपाय म्हणून पुण्यातील मिलिंद कुलकर्णी या ५१ वर्षीय व्यावसायिकांनी ८ जण प्रवास करू शकतील अशी सायकल बस तयार केली आहे. विशेष म्हणजे या सायकलबस साठी लायसन्सची गरज नाही कारण त्यात इंजिन, बॅटरीचा वापर केला गेलेला नाही आणि तिला इंधनाची गरज नाही.

कुलकर्णी यांचे दोन कारखाने आहेत. ते सांगतात माझा नेहमीच इकोफ्रेंडली उत्पादने बनविण्याकडे कल होता. त्यातून ही सायकलबस तयार केली. लोकांच्या गरजेप्रमाणे त्यात बदल करून ती तयार करून दिली जाणार आहे आणि तिची किंमत आहे दीड लाख रुपये. यात आठ जण एकावेळी जाऊ शकतात पण प्रत्येकाने पॅडल मारणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थी अथवा महाविद्यालयीन मुलांसाठी ती सोयीची ठरणार आहे. कारण त्यांच्यात उर्जा खूप असते त्याचा वापर होईल. काही लोकांनी या सायकलबस ची ट्रायल घेण्यासाठी संपर्क साधला आहे असेही त्यांनी सांगितले.

हे वाहन बनविण्यासाठी कुलकर्णी यांना १ महिना लागला. ते म्हणाले या वाहनाला गरज असेल तसे छत बनविता येते. सध्या अडचण एकाच आहे ती म्हणजे या वाहनाला पार्किंग साठी जागा जास्त लागते.

Leave a Comment