‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनील ग्रोवरची ‘वापसी’

combo
नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात कॉमेडी किंग कपिल शर्मा यशस्वी ठरला आहे. पण सुनील ग्रोवरसोबत काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर कपिल प्रचंड डिप्रेशनमध्ये होता. दरम्यान त्याचा हा कॉमेडी शोदेखील बंद पडला. पण कपिल काही दिवसांपूर्वीच पुन्हा याच शोसोबत पडद्यावर परतला आणि यशस्वी ठरला.

तर दुसरीकडे सुनील ग्रोवरचा कानपूरवाले खुराणा शो बंद पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे, लवकरच कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोवर परतणार असल्याची शक्यता एका माध्यमाने वर्तवली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुनील ‘भारत’च्या चित्रीकरणात व्यस्त होता. त्याने चित्रीकरणातून वेळ मिळताच मधला वेळ कानपूरवाले खुराणासाठी दिला. पण तो आता पुन्हा ‘भारत’च्या चित्रीकरणासाठी परतणार असून हे चित्रीकरण पूर्ण होताच सुनील कपिल शर्मा शोमध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे.

कपिलने याआधीच सुनील ग्रोवरसाठी आपल्या शोचे दरवाजे नेहमीच उघडे असणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता कपिलच्या शोमध्ये पुन्हा एकदा सुनील ग्रोवर परतणार असल्याने प्रेक्षकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

Leave a Comment