चीनच्या चंद्रावरील यानात कापसाच्या बीजाला फुटला अंकुर

lander
चीनने चंद्रावर पाठविलेल्या यानात शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात कापसाच्या बीजाला फुटला अंकुर फुटला आहे. अशा प्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावर उगवणारे हे पहिले रोपटे ठरले आहे.

चिनी शास्त्रज्ञांनी मंगळवारी ही माहिती दिली. चीनचे चांग इ4 हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर 3 जानेवारी रोजी उतरले होते. तेथील आतापर्यंत अंधारात राहिलेल्या भागाची छायाचित्रे या यानाने पाठविली होती. त्यातच हा प्रयोग करण्यात आला.

चोंगकिंग विद्यापीठाच्या अॅडवान्स्ड टेक्नोलॉजी रिसर्च इंस्टीट्यूटच्या शास्त्रज्ञांनी या प्रयोगाची काही छायाचित्रे प्रकाशित केली आहे. या छायाचित्रांनुसार या महिन्यात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या यानातील एका भांड्यात जाळीदार वातावरणात हे रोपटे उगवले आहे.
“मानवाने चंद्राच्या पृष्ठभागावर जीवशास्त्रातील वनस्पती विकासाचा प्रयोग करण्याची ही पहिली घटना आहे,” असे या प्रयोगाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ शाइ गेंगशिन यांनी झिन्हुआ वृत्तसंस्थेला सांगितले.

चोंगकिंग विद्यापीठाने वायु, जल आणि मातीने भरलेला 18 सेंटीमीटरचा एक डब्बा या प्रयोगासाठी पाठविला होता. यात कापूस, बटाटा आणि मोहरीच्या प्रत्येकी एका रोपट्याच्या बियांसोबत फ्रूट फ्लायचे अंडे आणि यिस्ट यांचा समावेश होता. या अंतरिक्ष यानाने पाठविलेल्या छायाचित्रांत कापसाचे बीज झपाट्याने विकसित होताना दिसते, मात्र अन्य रोपट्यांमध्ये बीज अंकुरण्याचे चिन्ह दिसत नाही, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Leave a Comment