अरुण जेटलींना झाला कर्करोग, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना

arun-jaitley
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कर्करोग झाला असल्याचे निदान झाले असून अरुण जेटली उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. अरुण जेटलींवर न्यूयॉर्कमध्ये सर्जरी करण्यात येणार आहे. यासंदर्भात द वायरने दिलेल्या वृत्तानुसार, मांडीतील पेशींचा कर्करोग जेटलींना झाला आहे. हा एक प्रकारचा ट्यूमर असून तो शरिरातील इतर भांगामध्ये जलदगतीने पसरतो. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण जेटली उपचारामुळे अर्थसंकल्प अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटलींवर सर्जरी करण्याचा निर्णय थोडा कठीण आहे. कारण मागील वर्षीच त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. मूत्रपिंडावर सर्जरीमुळे ताण येऊ शकतो. यामुळे सध्या सर्जरी करणे त्यांच्या शरिरासाठी हानिकारक ठरु शकते. अरुण जेटली यांनी अधिकृतपणे आपण दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन न्यूयॉर्कला जात असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment