जिओच्या ४ जी डाऊनलोड स्पीडमध्ये ८ टक्के घसरण – ट्राय

Jio
नवी दिल्ली – नोव्हेंबरच्या तुलनेत रिलायन्स जिओच्या ४ जी डाऊनलोड स्पीडमध्ये डिसेंबर महिन्यात ८ टक्के घसरण झाली आहे. १८.७ मेगाबीट प्रति सेकंद एवढा हा कमी झालेला वेग आहे. जिओच्या नेटवर्कचा डाऊनलोडचा वेग नोव्हेंबरमध्ये प्रति सेकंद २०.३ एमबीएपएस एवढा होता. असे असले तरी डाउनलोडच्या वेगात जिओच आघाडीवर राहिली आहे.

डिसेंबरमध्ये एअरटेल नेटवर्कच्या स्पीडमध्ये ९.७ एमबीपीएस वरुन ९.८ एमबीपीएस अशी सुधारणा झाली. याबाबतची माहिती मायस्पीड पोर्टलला दूरसंचार नियंत्रक प्राधिकरणाने दिली आहे. व्होडाफोन आणि आयडिया यांनी एकत्रित येत व्होडाफोन आयडिया कंपनी सुरू केली. त्यांच्या नेटवर्कच्या कामगिरीची स्वतंत्र आकडेवारी ट्रायने प्रसिद्ध केली.

डिसेंबरमध्ये व्होडाफोनच्या डाऊनलोडचा स्पीड हा घसरुन ६.८ वरुन ६.३ एमबीपीएस झाला आहे. तर आयडियाचा स्पीड हा ६.२३ एमबीपीएसवरुन ६ टक्के झाला आहे. आयडिया ४ जीच्या नेटवर्कमध्ये डाटा अपलोड करणाऱ्या कंपन्यात आघाडीवर राहिली आहे. आयडियाचा डाटा अपलोड स्पीड हा डिसेंबरमध्ये घसरुन ५.३ एमबीपीएस झाला आहे. नोव्हेंबरमध्ये डाटा अपलोड करण्याचा आयडियाचा स्पीड हा ५.६ एमबीपीएस एवढा होता.

मोबाईलवर व्हिडिओ पाहिले जाताना इंटरनेटची गती महत्त्वाची असते. इंटरनेट सर्फिंग, ई-मेल पाहणे आणि फोटो शेअर करणे यासाठी अपलोडिंगची गती आवश्यक असते. नोव्हेंबरमध्ये व्होडाफोनची इंटरनेट गती ४.९ एमबीपीएस असताना डिसेंबरमध्ये सुधारुन ५.१ एमपबीपीएस एवढी झआली. तर जिओच्या अपलोड गतीत घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये अपलोड गती ४.५ एमबीपीएस असताना डिसेंबरमध्ये ४.३ एमबीपीएस झाला. एअरटेलच्या इंटरनेट गतीत घसरण झाली. जीओ आणि आयडिया या दोन्ही कंपन्या डाटा डाऊनलोड करण्यात आघाडीवर आहेत. ही सर्व आकडेवारी ट्राय हे मायस्पीड अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सतत घेत असते.

Leave a Comment