सॅमसंग गॅलेक्सी एम २० स्मार्टफोन फिचर लिक

galaxym20
येत्या २८ जानेवारीला सॅमसंग गॅलेक्सी त्यांची नवी सिरीज एम लाँच करत आहे. या सिरीजमधील तीन स्मार्टफोन एम १०, एम २० आणि एम ३० बाजारात आणले जाणार आहेत पैकी एम १० आणि २० प्रथम येत आहेत. जे सिरीजला हि एम सिरीज रिप्लेस करेल असे सांगितले जात आहे. हे सर्व मिडल रेंज बजेट स्मार्टफोन आहेत.

पैकी एम २० स्मार्टफोनची फिचर लिक झाली असून त्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. मिडिया रिपोर्टनुसार या फोनला ६.१३ इंची इन्फिनिटी व्ही डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह दिला गेला आहे. अँड्राईड ८.१ ओरिओ ओएस, फिंगरप्रिंट सेन्सर, फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५ एमएएच बॅटरी, ३ जीबी रॅम, ३२ आणि ६४ जीबी स्टोरेज, ८ एमपीचा फ्रंट तर १३ व ५ एमपीचा ड्युअल कॅमेरा दिला गेला असून हे फोन अमेझोनवर विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एम १० ची किंमत १० हजाराच्या तर एम २० ची किंमत १५ हजाराच्या दरम्यान असून हे फोन प्रामुख्याने शाओमीचे रेड मी सिरीजशी मुकाबला करतील.

Leave a Comment