शेफ संपावर, ट्रम्पनी बाहेरून मागविले फुटबॉल खेळाडूंचे जेवण

dinner
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाउसमध्ये डिनरसाठी आमंत्रण दिलेल्या कॉलेज फुटबॉल टीमला फास्टफूड तेहि बाहेरून मागविलेले सर्व्ह केल्याने या खेळाडूंवर चकित होण्याची पाळी आली. मात्र ट्रम्प यांनी जेवणाअगोदर अमेरिकन सरकारचा शटडाऊन असल्याने व्हाईट हाउस मधील शेफ संपावर आहेत असे कारण दिले आणि ग्रेट अमेरिकन फूड असे जोरात ओरडून खेळाडूना जेवण्यास सुरवात करण्याची परवानगी दिली.

ट्रम्प यांनी जेवण बनविले गेलेले नाही असा खुलासा करताना मॅकडोनाल्ड बर्गर, डॉमिनोज पिझ्झा, व अन्य फ्राईड फूड मागविले होते. अर्थात याचे बिल त्यांना स्वतःच्या खिशातून भरावे लागले. व्हाईट हाउसच्या प्रेस सचिव सारा सँडर्स म्हणाल्या, क्लेम्सन टायगर कॉलेज टीमला ट्रम्प यांनी डिनरसाठी आमंत्रित केले होते. मात्र गेले २४ दिवस संप सुरु असल्याने व्हाईट हाउसचे शेफ सुट्टीवर आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आवडीचे पदार्थ मिळावेत यासाठी बाहेरून जेवण मागविले गेले.

मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी ट्रम्प सरकारने संसदेतून फंड देण्याची मागणी केली होती ती विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने मान्य केलेली नाही. यामुळे हा संप पुकारला गेला असून अमेरिकन इतिहासात दीर्घ काळ चाललेला संप ठरला आहे. ट्रम्प यांनी बजेटवर स्वाक्षरी न केल्याने ८ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी पगाराविना सुटीवर आहेत. गेल्या २२ डिसेम्बर पासून हा संप सुरु आहे.

Leave a Comment