गेली ३५ वर्षे पिवळ्या रंगात रंगलाय हा माणूस

abu-yellow
एखाद्या माणसाला अमुक एक रंग खूप आवडतो ही बाब सामान्य आहे. अर्थात एखादा रंग आवडतो म्हणून तो त्या रंगाच्या वस्तू अधिक प्रमाणात खरेदी करेल पण एकाच रंग आयुष्यभर वापरणार नाही. अर्थात जगात अनके अजुबे असतात तसाच एक सिरियातील आलेप्पो शहरात आहे. अबू जाक्कोर नावाचा हा माणूस गेली ३५ वर्षे फक्त पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरतो आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पिवळा हा प्रेमाचे प्रतिक आहे आणि मी प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे.

आलेप्पो मध्येच नाही तर जगात अबू यलो मॅन नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मिडीयावर आहेत. २५ जानेवारी १९८३ पासून त्याने पिवळा रंग आपलासा केला असून तो केवळ पिवळे शर्ट पँटच नाही तर अंडरवेअर, बूट, मोजे, रुमाल, टोपी, छत्री, मोबाईल कव्हर अश्या सर्व वस्तू पिवळ्या रंगाच्याच वापरतो. त्याच्या घरातही पिवळे टेबल, खुर्याक , टेबलक्लोथ, चादरी इतकेच काय पण कचऱ्याचा डबा सुद्धा पिवळा आहे. अबू म्हणतो पिवळ्या रंगाशिवाय वस्तूचा मी विचार करू शकत नाही. एखादी वस्तू पिवळ्या रंगात मिळाली नाही तर ती तो पिवळ्या रंगाने रंगवितो.

अबू इसीसचा तर कुणी अल कायदाचा खबऱ्या असल्याच्या अफवा उठविल्या गेल्या आहेत. सिरीयन लिबरेशन आर्मीने अबूला दहशतवादी समजून मारहाणही केली होती. पण अबूचा प्रेमावरच विश्वास कायम आहे. तो म्हणतो मी रस्त्यातून जात असलो तर लोक माझ्याकडे बघून हसतात, कुणी गप्पा मारतात. त्यामुळे मला आनंद होतो.

Leave a Comment