भारतीयांची पहिली पसंती पांढऱ्या रंगाच्या कार्सना

cars
दरवर्षी कार ग्राहकांची संख्या वाढत चालली असतानाच ग्राहक कोणत्या रंगाच्या कार्सला पहिली पसंती देत आहेत याची आकडेवारी बीएएसएफ या कारपेंट क्षेत्रातील कंपनीने नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार भारतीय कार ग्राहक पांढऱ्या रंगाच्या कार घेणे अधिक पसंत करत आहेत. त्यामागोमाग ग्रे आणि सिल्व्हर कलर पसंत केले जात आहेत.

पांढऱ्या रंगाच्या छोट्या कार भारतात अधिक लोकप्रिय आहेतच पण एसयूव्ही खरेदी करतानाही पांढऱ्या रंगाच्या गाड्यांना अधिक मागणी आहे. एकतर भारतात उन्हाचे प्रमाण अधिक आहे. पांढऱ्या रंगाच्या गाड्या अन्य रंगांच्या तुलनेत कमी तापतात हे कारण त्यामागे असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. पूर्वी सर्व सरकारी गाड्या पांढऱ्या रंगाच्या असत त्यामुळे या रंगाचा एक दबदबा होता तेही कारण यामागे असू शकेल.

२०१८ सालात विकल्या गेलेल्या कार्स मध्ये पांढऱ्या एसयुवीचे प्रमाण ४१ टक्के तर लहान कार्सचे प्रमाण ४३ टक्के आहे. त्यापाठोपाठ ग्रे आणि सिल्वर कार्सला पसंती देणाऱ्यांचे प्रमाण १५ टक्के, लाल रंगाचे ९ टक्के, निळा ७ टक्के तर काळ्या रंगाला फक्त ३ टक्के पसंती दिली गेली आहे. भारतात गेल्या वर्षात ३३९४७५६ कार्स विकल्या गेल्या आहेत.

Leave a Comment