‘ही’ महिला ऐकू शकत नाही पुरुषांची मन की बात

hear
आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारांच्या आजाराबद्दल ऐकले असेल, परंतु आज आम्ही तुम्हाला एका महिलेला झालेल्या विचित्र आजाराबद्दल सांगणार आहोत, हे ऐकून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. या विचित्र आजारामुळे ही महिला सध्या सोशल मीडियावर ही खूप चर्चे मध्ये आहे.

या महिलेला फक्त स्त्रियांचे आवाज ऐकू येतात, पण पुरुषांचा आवाज या महिलेला ऐकू येत नाही. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतू हे खरे आहे. चीनमध्ये अशी एक महिला आहे की, जिला पुरुषांचा आवाज ऐकू येत नाही. ही महिला सध्या Rare Hearing-Loss condition स्थितीतून जात आहे, ज्यामुळे तिला पुरुषांचा आवाज आवाज ऐकू येत नाही.

चीनच्या या महिलेचे नाव चेन (Chen) असे आहे, चेन जियामेन येथे राहणारी आहे. आशिया वायर रिपोर्टच्या अहवालानुसार, सकाळी चेन झोपेतून उठली तेव्हा तिला तिच्या प्रियकराचा आवाज ऐकू आला नाही. तो बोलत होता, पण चेन काहीच ऐकू येत नव्हते. आदल्या रात्री तिच्या कानात घंटी वाजल्यासारखा काहीसा आवाज ऐकू आला त्यानंतर तिला उलट्यादेखील झाल्या.

त्यानंतर चेनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा समजले की तिच्या कानाला (लो-फ्रिक्वेंसी) कमी तीव्रतेचा आवाज ऐकू येत नाही. या अवस्थेला ‘रिवर्स-स्लोप हियरिंग लॉस’ असे म्हटले जाते. यामुळे चेनाला ही महिलाचा आवाज तर ऐकू शकते मात्र पुरुषांचा नाही.

अनेक तज्ञ डॉक्टरांनी चेनाची तपासणी केली आणि असे आढळून आले की, तिला Reverse-slope hearing loss (RSHL) आहे. म्हणजेच कमी तीव्रता असलेला आवाज ऐकू येत नाही.

Leave a Comment